Home /News /maharashtra /

भिवंडीत 4 झोपड्यांना अचानक लागली आग, 80 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू

भिवंडीत 4 झोपड्यांना अचानक लागली आग, 80 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू

एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून 3 महिला जखमी झाल्या आहेत.

भिवंडी, 8 नोव्हेंबर : भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर कंपाऊंड येथील झोपड्यांना रात्री साडे आठ वाजता लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तसंच एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून 3 महिला जखमी झाल्या आहेत. भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब कुटुंबियांची वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे. राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गजानन वाफेकर कंपाऊंड येथील गोदाम लगत 20 झोपड्या असून रविवार असल्याने सर्व मोलमजुरी करणारे कुटुंबीय घरीच होते. अशातच सायंकाळी झोपडीत देवा समोर दिवा लावून ठेवला असताना अचानक दिवा कलंडल्याने आग लागली. कागदी पुठ्ठा ,प्लायवुड ,प्लास्टिक आच्छादन करून बनविलेल्या झोपड्या असल्याने ही आग झपाट्याने पसरल्याने या आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या चार झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीमुळे येथील सर्व कुटुंबियांनी घराबाहेर पडून स्वतःचा जावं वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु 80 वर्ष वयाची वृद्ध महिलेला झोपडी बाहेर झटपट पडता न आल्याने आगीच्या ज्वालांनी ती वेढली गेली. या आगीत तिचा होरपळून मृत्यू झाला आहे. लक्ष्मी शिवाजी म्हसकर असे मयत वृद्ध महिलेचे नाव असून या आगीत ज्योती गोपीनाथ सरे ,अंजु गोपीनाथ सरे, सुरेखा सुरेश राठोड या तीन महिला जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व स्थानिक नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग पूर्णपणे विझवली. या आगीत या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबियांचे पूर्ण संसार जळून खाक झाले असून घरातील कपडे ,पैसे दागिने यांचंही अतोनात नुकसान झालं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bhiwandi, Fire

पुढील बातम्या