• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोरोना व्हायरसमुळे रेडलाईट एरिया बंद, 300 हून अधिक वारांगणा घेताहेत 'ही' काळजी

कोरोना व्हायरसमुळे रेडलाईट एरिया बंद, 300 हून अधिक वारांगणा घेताहेत 'ही' काळजी

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट एरियामधील 300 हून अधिक वारांगणांनी येत्या रविवारपर्यंत देहविक्रीचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
भिवंडी, 20 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, दुकाने, मॉल बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शासकीय कार्यालयातही 50 टक्के कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारभार सुरु आहे. दुसरीकडे, भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट एरियामधील 300 हून अधिक वारांगणांनी येत्या रविवारपर्यंत देहविक्रीचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीसाठी या परिसरात बंदी घातलण्यात आली आहे. हेही वाचा.. पोलिस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना जन्मठेप चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सरकारने विशेष उपाययोजना केल्या आहेत. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्यातील अनेक समाजसेवी संस्थाही सरसावल्या आहेत. यात हातभार लावण्यासाठी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट परिसरातील देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 300 हून अधिक महिला पुढे आल्या आहेत. या महिलांनीही कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. हेही वाचा... ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी लोकल आणि एक्सप्रेस बंद राहणार का? रेल्वेने केला खुलासा येथील महिलांच्या मुलांसाठी बाळ संगोपन केंद्र चालविणाऱ्या डॉ. स्वाती खान यांनी या ठिकाणी महिलांची सभा घेऊन त्यांना या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय खबरदारी घेणं गरजेचे आहे, याबाबत मार्गदर्शन केलं. कोरोना व्हायरस स्पर्शाने पसरत असल्याने व येथील महिलांचा स्पर्श हा केंद्रीभूत मानून येथील महिलांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर येत्या रविवारपर्यंत येथील परिसरात बाहेरील व्यक्तीसाठी बंदी करण्यात आली आहे. अशी माहिती डॉ.स्वाती खान यांनी दिली आहे . जग या व्हायरस पासून घाबरले असताना आम्हाला सुध्दा आमच्या आरोग्याची काळजी आहे. आम्ही पुढील तीन दिवस व्यवसाय बंद ठेवून बाहेरील व्यक्तीस या परिसरात येऊ देणार नसल्याची माहिती येथील वारांगणांनी दिली आहे. हेही वाचा.. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावावर पुण्यात पेट्रोल डिलर असोसिएशनचा मोठा निर्णय
Published by:Sandip Parolekar
First published: