बहिणीला तलाक न देणाऱ्या पतीवर मेव्हण्यांनी केला वस्ताऱ्याने सपासप वार..

बहिणीला तलाक न देणाऱ्या पतीवर मेव्हण्यांनी केला वस्ताऱ्याने सपासप वार..

दिलशाद हा अजंता कंपाऊंड येथील एका टी स्टॉलवर चहा पित होता. तितक्यात इर्शाद व शमशाद व त्यांच्या दोन साथीदारांनी दिलशाद मोमीन याची पाठ, दोन्ही हात तसेच पोटावर वस्ताऱ्यानं सपासप वार करून पसार झाले.

  • Share this:

भिवंडी, 6 सप्टेंबर: आपल्या बहीणीचा पती बहिणीस तलाक देत नसल्याने आणि या  बाबत पोलिसांकडे  केस करून त्रास देत असल्याच्या रागातून दोघा सख्ख्या मेव्हण्यांनी आपल्या बहिणीच्या पतीवर वस्ताऱ्याने सपासप वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यात दिलशाद मोमीन (वय-29) गंभीर जखमी झाला आहे. इर्शाद व शमशाद अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा...शिवसेना नेते संतापले, दाऊद काय, त्याचा बापानं धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरत नाही

दिलशाद मोमीन याचं इर्शाद व शमशाद यांच्या बहिणीसोबत काही वर्षांपूर्वी निकाह (विवाह) झाला आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून पत्नी व तिचे दोघे भाऊ हे दिलशाद मोमीनकडे तलाकसाठी तगादा लावत आहे. याबाबत भिवंडी न्यायालयात दावा दाखल असतानाच या तिघांकडून त्रास दिला जात असल्यानं दिलशाद यानं भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार व चॅप्टर केस दाखल केली आहे. त्याचा राग मनात धरून इर्शाद व शमशाद या दोघांनी दिलशाद याच्यावर हल्ला केला.

दिलशाद हा अजंता कंपाऊंड येथील एका टी स्टॉलवर चहा पित होता. तितक्यात इर्शाद व शमशाद व त्यांच्या दोन साथीदारांनी दिलशाद मोमीन याची पाठ, दोन्ही हात तसेच पोटावर वस्ताऱ्यानं सपासप वार करून पसार झाले. रक्तबंभाळ झालेल्या दिलशाद मोमीन यावर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून भोईवाडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून पती ने दिला मोबाईल वर तलाक...

दरम्यान, पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून पतीनं तिला मोबाईलवर तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

शास्त्री नगर भागात 24 वर्षीय पीडिता पती खालिद जावेद शेख याच्यासोबत राहते. 29 ऑगस्टला पीडिता भिवंडी शहरातीलच गैबिनगर औलिया मशीद परिसरातील आपल्या माहेरी गेली होती. पत्नी घरी दिसली नाही म्हणून खालिद जावेद शेख याने फोन करून 'तू आईच्या घरी का गेलीस' असा जाब विचारत तिला शिविगाळ केली. रागाच्या भरात पती खालिद शेख यानं मोबाईल वरच मला तुझ्यासोबत राहायचे नसून मी तुला याक्षणी तलाक देत असल्याचे सांगत मोबाईलवर तीन वेळा तलाक दिला.

हेही वाचा...बॉयफ्रेंड अर्जुन कपूरनंतर अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोना

या प्रकरणी पीडितेनं शांतीनगर पोलीस ठाण्यात पती खालिद शेख या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी खालिद शेख विरोधात भादंवि कलम 323, 504 सह मुस्लिम स्त्रीयांच्या लग्नाच्या हक्कांचे संरक्षण अध्यादेशच्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे हे करीत आहेत .

Published by: Sandip Parolekar
First published: September 6, 2020, 7:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading