मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एल्गार परिषद प्रकरण : NIA ची टीम रिकाम्या हाती माघारी परतली, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

एल्गार परिषद प्रकरण : NIA ची टीम रिकाम्या हाती माघारी परतली, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

या तपासाची कागदपत्र हाती घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसली आहे

या तपासाची कागदपत्र हाती घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसली आहे

या तपासाची कागदपत्र हाती घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसली आहे

पुणे, 27 जानेवारी : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे. या तपासाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी एनआयए राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(National Investigation Agency )ची टीम आज दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाली होती. पण रिकाम्या हातानेच या टीमला परतावे लागले आहे.

आज या प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र हाती घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसली होती. परंतु, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परवानगी येत नाही. तोवर तपासाची कागदपत्र देता येणार नाहीत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. अखेर रात्री उशिरा ही टीम रिकाम्या हाताने माघारी परतली.

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या मु्द्दयावर राज्य सरकार सर्व कायदेशीर बाबींचा तपास करत आहे. तसंच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कसा होणार होता तपास वर्ग?

केंद्रीय गृहमंत्रालय महाराष्ट्र गृहमंत्रलायाला कळवणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य अतिरिक्त सचिव गृह हे पोलीस महासंचालक कार्यालयाला आदेश देणार त्यानंतर

पोलीस महासंचालक हे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश देतील, अशी ही पहिली प्राथमिक प्रक्रिया होती.

जर ही प्रक्रिया झाली नाही तर एनआयए कोर्टाच्या आदेशानुसार वॉरंट घेऊन पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर अधिकारी हजर राहतील आणि आरोपी आणि गुन्हा वर्ग करायचे परवानगी मागतील. न्यायालयाच्या आदेशानुसार, गुन्हा आणि आरोपी वर्ग केले जातील. या प्रकरणात आरोपीचे वकील आक्षेप घेऊ शकतात. त्यांवर ही सुनावणी होऊन निर्णय होऊ शकतो.

'सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे NIA कडे तपास', शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या प्रकरणातील मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप केला. शरद पवार यांच्या पत्रानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता.

भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(National Investigation Agency )कडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली. 'सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,' असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला.

'कायदा व सुवव्यवस्था हे राज्य सरकारचं काम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणं म्हणजे नक्षलवाद नव्हे. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी केली आहे. सत्य बाहेर या भितीनं एनआयएकडे तपास,' असं पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील तपासाबाबत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलिसांशी आढावा बैठक घेतली होती. मात्र, आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. हा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असा आरोप केला आहे की, केंद्र सरकारने त्यांच्याशी यापूर्वी कोणतीही चर्चा केली नव्हती. यापूर्वी आढावा बैठकीची काही प्रकरणे मागे घेण्यात आली होती आणि एसआयटीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Shivsena, काँग्रेस, शरद पवार