पवारांच्या पत्रानंतर मोदी सरकारची खेळी, एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला!

पवारांच्या पत्रानंतर मोदी सरकारची खेळी, एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला!

एल्गार परिषद प्रकरणात मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता

  • Share this:

पुणे, 24 जानेवारी : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणाच्या तपासाची राज्य सरकारने हालचाल सुरू केली असता केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एल्गार परिषदेचा तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे.

शरद पवार यांनी पत्र लिहिताच केंद्र सरकारने या प्रकरणात अचानकपणे एंट्री घेतली आहे. केंद्र सरकारने एल्गार परिषद प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे सोपवला आहे. एनआयएकडे तपास सोपवून केंद्र सरकारने शरद पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार पत्रात काय म्हणाले?

कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सुत्रधारांना पाठीशी घालून मुख्य मुद्यांवरून लक्ष हटवण्याचे षडयंत्र तत्कालीन राज्य सरकारने केल्याचा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला. 'अटक झालेल्या सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादित कविता वाचली. 'जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीये शहर मैं...अगर बगावत ना हो तो बहेतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये...'यासाठी त्यांना अटक केली,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'डॉ.आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गोलपीठामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे, ती साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाज विघातक म्हणून निष्कर्ष काढू नये. पोलीस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत याची खोलात जाऊन चौकशी आवश्यकता आहे,' अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

- कोरेगाव भीमा दंगलीस एल्गार परिषदेतील चिथावणीखोर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

- यातील काही जणांच्या माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली.

- यामध्ये काही बुद्धिजीवी आणि प्रतिष्ठित लोकांचं समावेश आहे.

- याप्रकरणी SIT नेमावी अशी मागणी शरद पवार यांनी केली.

First published: January 24, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading