भीमा कोरेगाव प्रकरण: आनंद तेलतुंबडे यांना 5 दिवसांची NIA कस्टडी

भीमा कोरेगाव प्रकरण: आनंद तेलतुंबडे यांना 5 दिवसांची NIA कस्टडी

फेब्रुवारी 2019 मध्ये पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : भीमा कोरेगाव (Bhima-koregaon) हिंसाचार प्रकरणी NIAने अखेर आनंद तेलतुंबडे यांना आज अटक केली. मुंबईतील NIA कोर्टाने आनंद तेलतुंबडे यांना पाच दिवसांच्या NIA च्या कस्टडीत पाठविले आहे. आज त्यांनी एनआयएकडे आत्मसमर्पक केलं होतं.

सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करा असा आदेश तेलतुंबडे यांना दिला होता. फेब्रुवारी 2019मध्ये पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी त्या अटकेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान दिलं होतं. तेलतुंबडे यांच्यासह गौतम नवलखा आणि इतर काही लोकांवरही पुणे पोलिसांनी कारवाई केली होती.

आज सकाळी तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती, यावेळी वंचित बहुजन महाआघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. पुणे पोलिसांच्या कारवाईला त्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. नंतर त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात NIA चौकशीची भूमिका घेतली होती. सु्प्रीम कोर्टात  सगळया पुराव्याचे अवलोकन केले. NIA ने आपली बाजू मांडत जामिनाला कडाडून विरोध केला. दोन तास झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने येत्या तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. तसेच दोघांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

हे वाचा -

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 2684 वर, आज 350 रुग्णांची नोंद

दिलासादायक! मुंबईच्या हॉटस्पॉटमधली 129 मंडळी आज बरी होऊन घरी परतली

 

 

First Published: Apr 14, 2020 09:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading