मुंबई, 25 जुलै : कोकण, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) स्वत: कोकणात पोहोचले असून दुर्घटनाग्रस्त भागात जाऊन पाहणी करत आहे. याच दरम्यान, सेनेचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनसेचे नेते अमय खोपकर ( amey khopkar) यांनी भास्कर जाधव एका महिलेवर हात उगारत असल्याचा आरोप केला आहे.
अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर असतानाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याभोवती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत सेनेचे आमदार भास्कर जाधव, परिवहन मंत्री अनिल परब आणि इतर नेते आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुमच्यासोबत असलेल्या ‘राजकीय’ बाऊन्सर्सना आवरा. भास्कराची कुस्करी करायला कोकणी जनतेला वेळ लागणार नाही. एका महिलेवर हात उगारणाऱ्या भास्कराचा कडक शब्दात निषेध. या भास्कराचा अस्त झालाच पाहिजे. pic.twitter.com/D0G1pquW2V
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 25, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील लोकांची विचारपूस करत पुढे चालले होते. त्यामुळे त्यांच्याभोवती माध्यमांचे प्रतिनिधी आणि लोकांची गर्दी झाली होती. पोलीस गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी समोर असलेल्या एका महिलेवर हात उगारला, असा आरोप अमेय खोपकर यांनी केला.
चेहऱ्यावर निळे डाग येणं म्हणजे धोक्याची घंटा; दुर्लक्ष करू नका
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुमच्यासोबत असलेल्या ‘राजकीय’ बाऊन्सर्सना आवरा. भास्कर जाधव यांची कुस्करी करायला कोकणी जनतेला वेळ लागणार नाही, असं म्हणत खोपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
तसंच, 'एका महिलेवर हात उगारणाऱ्या भास्कर जाधव यांचा कडक शब्दात निषेध, या भास्कराचा अस्त झालाच पाहिजे, अशी टीकाही खोपकर यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhaskar jadhav, Woman