मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्यांना' वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा; भास्कर जाधवांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

'त्यांना' वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा; भास्कर जाधवांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांना तात्काळ नेतेपदावरून हटवावं. अन्यथा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं, असा खोचक टोलाही  भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 19 सप्टेंबर : शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदमांची सभा राजकीय वैचारिक बैठकीला छेद देणारी सभा होती, असं ते म्हणाले. मुंबईतील एकूण शौचाल्यातून जेवढी घाण निघत नाही तेवढी घाण एकट्या रामदास कदम यांच्या तोंडातून पडली, अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर केली आहे.

gram panchayat election result : अमरावतीत राणा दाम्पत्याला धक्का, काँग्रेसने करून दाखवलं, शिंदे गट शुन्यावर बाद

एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना तात्काळ नेतेपदावरून हटवावं. अन्यथा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं, असा खोचक टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका महाराष्ट्रातल्या महिला वर्गाने ऐकल्यावर त्यांची जोड्याने पूजा होईल, असंही भास्कर जाधव यावेळी बोलताना म्हणाले.

कालच्या सभेमुळे रामदास कदम यांनी स्वतः सह स्वतःच्या मुलाच्या राजकीय भविष्याची माती केली आहे. मी पक्ष सोडल्यावर कधीही कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. रामदास कदम यांना महाराष्ट्र विसरला आहे, असंही ते पुढे म्हणाले. मी MIDC मधून हप्ते घेतो हे एकदा संबंधित माणसाला समोर आणून सिद्ध करा. तुम्ही सिद्ध केलं, तर मी राजकीय सन्यास घेतो अन्यथा तुम्ही तुमच्या मुलासोबत राजकारण सोडा, असं चॅलेंज जाधव यांनी दिलं आहे.

'गुजाराती समजाला आरक्षण दिलं कारण माझा जावई..', सुशीलकुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट, स्वपक्षावरही गंभीर आरोप

पुढे ते म्हणाले, की प्रताप सरनाईक यांची ED चौकशीतून मुक्तता झाली याबद्दल आनंद आहे. पण ज्यांनी 3 वर्षे केवळ आरोप केले, कौटुंबिक सुख हिरावलं त्यांच्याकडून उत्तर मागण्याची गरज आहे. प्रताप सरनाईक यांनी ते उत्तर घ्यावं.

First published:

Tags: Bhaskar jadhav, Ramdas kadam