भाजपच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झालीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 07:47 PM IST

भाजपच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

मुंबई 11 ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. लाड यांनी राज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. लाड हे विधान परिषदेचे आमदार असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे. राज ठाकरे हे गेल्या पाच वर्षांपासून भाजपवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करताहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. तर ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलंय. आपले आणि राज ठाकरे यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. वारंवार आमच्या भेटी होत असतात. त्यात राजकारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आश्चर्याचा धक्का! 'सेल्फी' प्रकरणी एकनाथ खडसे धावले महाजनांच्या मदतीला

गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग वाढलं. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. विधानसभा निवडणुकीत मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनसे आघाडीत सामील होऊन निवडणुक लढवेल असं बोललं जातं आहे. मात्र मनसेने स्वतंत्र पणे निवडणूक लढवावी असा मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे.

मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर त्याचा मोठा फायदा आघाडीला होऊ शकतो. EVM ऐवजी बॅलेटपेपरने निवडणुका घ्याव्यात अशी राज यांची मागणी आहे. तर अशा निवडणुका घेता येणं आता शक्य नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. EVMनेच निवडणुका घेतल्या तर मनसे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलं जातेय. मात्र यासाठी इतर पक्ष तयार नाहीत.

Loading...

VIDEO : 'ए... चूप बसायचं', पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी

त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसेचा समावेश होतो काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असाही मतप्रवाह राष्ट्रवादीत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मनसेने स्वतंत्रपणे लढविली तर भाजप आणि शिवसेनेला मिळणारी तरुणांची मतं खेचली जातील असा कयास बांधला जातोय.

कोल्हापुरात घडू शकते अनुचित घटना? जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा बंदीचे आदेश

भाजपवर पुन्हा टीका

मुंबईत 9 ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात राज ठकरे यांनी भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले, भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या किती जागा निवडून येतील, याचा आकडा सांगतात. यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून? आताही भाजपचं कोणीतरी म्हणालं आहे की आमच्या 250 जागा निवडून येतील. भाजपच्या इतक्या जागा निवडून येणार तर आम्ही काय उरलेल्या जागांवर गोट्या खेळायच्या का?' असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट केलं होतं.

'ज्यादिवशी महाराष्ट्रावर या भाजपच्या लोकांचा वरवंटा फिरेल तो मराठा ब्राह्मण, माळी किंवा धनगर म्हणून नाही तर मराठी म्हणून फिरेल. तेव्हा भाजपला समर्थन देणाऱ्यांना कळेल,' असा घणाघात राज ठाकरेंनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...