Home /News /maharashtra /

Ganesh Naik: भाजप नेते गणेश नाईक यांनाही दिलासा, तूर्तास अटक टळली; अटकपूर्व जामीन मंजूर

Ganesh Naik: भाजप नेते गणेश नाईक यांनाही दिलासा, तूर्तास अटक टळली; अटकपूर्व जामीन मंजूर

भारतीय जनता पक्षाचे (BJP MLA Ganesh Naik) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांना दिलासा मिळाला आहे.

    नवी मुंबई, 04 मे: भारतीय जनता पक्षाचे (BJP MLA Ganesh Naik) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांना दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांना जामीन मंजूर (Granted bail) करण्यात आला आहे. बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना मंजूर केला. यावेळी त्यांना तपास कामात पोलिसांना सहकार्य करायचं आणि बाहेर जाण्याआधी पोलिसांना कळवायचे अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेनं केली आहे. 'माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. डीएनए टेस्ट केल्याशिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं. अखेर 12 दिवसांनंतर कोठडीतून सुटका, राणा दाम्पत्याला अखेर दिलासा 'आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही, आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुला विषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही. अशी प्रतिक्रिया देखील पीडित महिलेने व्यक्त केलीय. यासोबतच मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याचे या महिलेनं स्पष्ट केलंय.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Ganesh naik

    पुढील बातम्या