सोवळं नेसलं नाही म्हणून अंबाबाईच्या गाभाऱ्यात भारत पाटणकरांना प्रवेश नाकारला

सोवळं नेसलं नाही म्हणून अंबाबाईच्या गाभाऱ्यात भारत पाटणकरांना  प्रवेश नाकारला

कोल्हापूरचं अंबाबाईचं देवस्थान हे एक जागृत देवस्थान मानलं जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यात गेली अनेक वर्ष स्त्रियांना प्रवेश नव्हता. तर मंदिराच्या गाभाऱ्यात पुरूषांना सोवळं नेसूनच प्रवेश दिला जाण्याची प्रथा आहे.

  • Share this:

कोल्हापूर,15 डिसेंबर  - पुरोगामी विचारवंत  आणि श्रमिक  मुक्ती दलाचे नेते  भारत पाटणकर यांना आज कोल्हापूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश नाकारला आहे. त्यांनी सोवळं नेसलं नसल्यामुळे मंदिर प्रशासनाने हा प्रवेश नाकारला आहे.

कोल्हापूरचं अंबाबाईचं देवस्थान हे एक जागृत देवस्थान मानलं जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यात गेली अनेक वर्ष स्त्रियांना प्रवेश नव्हता. तर मंदिराच्या गाभाऱ्यात  पुरूषांना सोवळं नेसूनच  प्रवेश दिला जाण्याची प्रथा आहे. या नियमांचं गेले अनेक वर्ष काटेकोरपणे पालन केलं जातं. कोल्हापूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं होतं. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी अंबाबाईचं दर्शनही घेतलं होतं. गेले काही दिवसांपासून कोल्हापूरच्या मंदिरात महिला पुजारी ठेवाव्यात अशी मागणीही केली जाते आहे.

पण आता मात्र भारत पाटणकर यांना फक्त सोवळे नेसले नाही म्हणून प्रवेश नाकारल्यामुळे खळबळ माजली आहे. यापुढच्या काळात आता मंदिर प्रवेशाचा वाद चिघळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 01:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading