पानसरे हत्या प्रकरणात मोठी बातमी, भरत कुरणे महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात

पानसरे हत्या प्रकरणात मोठी बातमी, भरत कुरणे महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात

कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरणाता आता एक नवी माहिती हाती लागली आहे ती म्हणजे गौरी लंकेश यांच्या हत्येत आरोपी असलेला भरत कुरणे हा आता महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 01 डिसेंबर : कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरणाता आता एक नवी माहिती हाती लागली आहे ती म्हणजे गौरी लंकेश यांच्या हत्येत आरोपी असलेला भरत कुरणे हा आता महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात आहे. काल रात्री बंगळुरूमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

शनिवारी 12 वाजता कोल्हापूर न्यायालयासमोर भरत कुरणे यांना हजर करणार आहेत. कुरणे हा गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी आहे. कर्नाटक सीआयडीकडून एसआयटीने कुरणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून अटक केलेला सागर सुंदर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणात याची व्हॅन वापरात आल्याचा कर्नाटक एसआयटीला संशय आहे.

शिवाय लंकेश हत्येनंतर भरत कुरणेच्या फार्म हाउसवर जी पार्टी झाली त्या पार्टीत याचा सहभाग होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीला मिळाली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भरत कुरणे ज्याचा हा फार्म हाउस आहे तो देखील शिवप्रतिष्ठानचा कडवा कार्यकर्ता आहे.

चिखलेगावाशेजारीच भरत कुरणे यांने एक रिसॉर्ट बांधलं होतं. याच रिसॉर्टमधून सगळ्या हत्यांचा कट शिजला. आतापर्यंत पकडलेल्या सगळ्या संशयितांनी  चिखले गावामध्ये हजेरी लावली होती. निर्मनुष्य असलेल्या या परिसरामध्ये घनदाट जंगलात बंदुका चालविण्याचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतल्याची माहिती न्यूज १८ लोकमतला एसआयटीच्या सूत्रांनी दिली होती.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते. यातलं पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे.

VIDEO : दीड वर्षाच्या चिमुकलीला बाईकची धडक, कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार

First published: December 1, 2018, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading