बुलडाणा, 17 नोव्हेंबर : भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक विधान करून वादाला तोंड फोडले आहे. हा वाद सुरू असतानाच आता काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी नथुराम गोडसे यांच्याबद्दल वक्तव्य करत नवा वादाला तोंड फोडले आहे. नथुराम गोडसेचे समर्थन करणारे गुन्हेगार असल्याचे म्हणत त्यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली.
काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी एक विधान केले ते म्हणाले की, नथुराम गोडसे हे हत्यारे आहेतच त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. तर त्या नथुरामला समर्थन करणारे ही गुन्हेगार आहेत. अस मत व्यक्त केलं आहे. शेगाव येथे राहुल गांधी यांची होणारी सभा त्याठिकाणी चंद्रकांत हंडोरे आले होते. या सभेला सोनिया गांधींसह महाविकास आघाडीचे बडे नेते सहभागी होणार असल्याची माहिती हंडोरे यांनी दिली.
हे ही वाचा : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी, दूध संघाचा वाद घराणेशाहीवर गेला
नाना पटोलेंचे सावरकांवर वक्तव्य
सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रुपये पेन्शनदेखील घेत होते. सावरकरांना अपमानित करणारा विचार जमिनीत गाडणार, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले, की 'हेच सावरकर यांचे विचार आहेत.' नाना पटोले शेगावमध्ये आले असता याबद्दल बोलले. भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. उलट सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती, असं पटोले म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले होते
याआधी राहुल गांधींनीही नुकतंच सावरकरांबाबत मोठं विधान केलं होतं. 'सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत.
हे ही वाचा : 'ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न द्या', राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली', असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, Nana Patole, Rahul gandhi