शिवसेनेच्या आमदारांमध्ये वाढती खदखद, आता हे आमदार झाले नाराज

शिवसेनेच्या आमदारांमध्ये वाढती खदखद, आता हे आमदार झाले नाराज

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं सरकार सत्तेत आलं. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार महत्त्वाचं खातं न मिळाल्यामुळं नाराज आहे तर दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं अनेक आमदार नाराज झालेत.

  • Share this:

महाड, 9 जानेवारी: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील आमदार नाराज झाले. सर्वाधिक नाराजी काँग्रेस पक्षातून आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेतेही नाराज आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तर कॅबिनेट मंत्री न केल्यामुळं राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यामुळं महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळात काहीही अलबेल नसल्याचं समोर आलं. आता शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले नाराज आहे. गोगावलेंच्या समर्थकांनी नाराजी उघड केली आहे.

राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर अखेर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं सरकार सत्तेत आलं. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतलेले

आमदार महत्त्वाचं खातं न मिळाल्यामुळं नाराज आहे तर दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं अनेक आमदार नाराज झालेत. अनेक आमदारांनी तर आपली नाराजी समर्थकाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींसमोर मांडली. आता शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं नाराज झाले. त्यांनी समर्थकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. महाड विधानसभेतून सलग तीन वेळा निवडून आलेल्या भरत गोगावले यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुंळं त्यांच्या समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा - या खेकड्याच्या नांग्या ठेचा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

आमदार भरत गोगावले यांचे समर्थक असलेसल्या दक्षिण रायगडमधील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ माणगावमध्ये सभा घेण्यात आली होती. या सभेत भरत गोगावले यांना मंत्री करण्याची मागणी

त्यांच्या समर्थकांनी केली आहे. तसेच गोगावले यांच्यावर अन्याय झाल्याच्या भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. तसेच गोगावले यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं आहे.

मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांच्याकडे माणगावातील शिवसैनिक नाराजी व्यक्त करणार आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. असं असताना आमदार अदिती तटकरे यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. मग तीन वेळा निवडून आलेल्या भरत गोगावले या निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय झाल्याच्या समर्थकांच्या

भावना आहे. त्यामुळं गोगावले समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी नाराज शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंशी भेट घडवून आणणार आहे. असं असलं तरी मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहे.

वाचा - भगवान गडावर पोहोचताच धनंजय मुंडेंचा पंकजा ताईंना टोला, म्हणाले...

अनेकांची नाराजी उघड झाली आहे. तर काही आमदारांची नाराजी उघड झाली नाही. त्यामुळं पुढील काळात शिवसेना आमदार आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठी कशी दूर करणार हेच आता पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2020 07:14 PM IST

ताज्या बातम्या