दुकान बंद करायला लावणाऱ्यांच्या डोळ्यात व्यापाऱ्याने फेकली मिरची पावडर, यवतमाळमध्ये तणाव

दुकान बंद करायला लावणाऱ्यांच्या डोळ्यात व्यापाऱ्याने फेकली मिरची पावडर, यवतमाळमध्ये तणाव

आंदोलकांकडून बळजबरीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • Share this:

भास्कर मेहरे, यवतमाळ, 29 जानेवारी : विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील काही भागात हिंसक वळण लागलं आहे. यवतमाळमध्ये बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला शहरात हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांकडून जमावावर जोरदार लाठीमार करण्यात आला.

नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सामाजिक आणि राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. त्यानंतर बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली. मात्र या बंदवेळी व्यापारी आणि आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांकडून बळजबरीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुकानातील साहित्याची नासधूस करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्याने आंदोलकांवर मिरची पावडर भिरकावली. या प्रकारानंतर यवतमाळमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. पश्चिम बंगालमध्येही नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. CAA ला विरोध करणाऱ्या आंदोलनादरम्यान एकाच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीबाद येथे CAA-NRC विरोधात आंदोलन उगारले होते. येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

First published: January 29, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या