मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bhandara : मासे पकडण्यासाठी गेला, मासा गळाला लागला पण तो बुडाला

Bhandara : मासे पकडण्यासाठी गेला, मासा गळाला लागला पण तो बुडाला

गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara)

गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara)

गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara)

  भंडारा, 22 सप्टेंबर : गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्याकरिता गेलेल्या एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ येथे उघडीस आली आहे. (Bhandara) संजय नारायण बावणे (वय 34 वर्ष रा. मांडळ) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संजय यांचा व्यवसाय मासेमारीचा असून तो घरी असताना आईला सांगून तलावामध्ये मासे पकडण्याकरिता जातो असे म्हणून निघाला होता.

  दरम्यान मासे पकडत असताना तो पाण्यात पडून बुडू लागला. तो बुडत असताना गावातील तीन-चार तरुण त्याला वाचवण्याकरिता पाण्यात धावले. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आल्याने अखेर संजयचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचत घटनेचा पंचनामा केला आहे. संजयच्या मृत्युने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

  हे ही वाचा : वादाचं रुपांतर भयानक घटनेत; पुण्यात पत्नीची हत्या करुन पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

  पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

  घर आणि शाळेच्यामध्ये नदी असल्याने चिमुकले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून शाळा गाठत आहेत. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख गावातील हा प्रकार आहे. पावसाळ्यात नदीवर पूर येतो. बोर्डी नदीवर पूल नसल्याने चिमुकल्यांना शिक्षणासाठी नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे.

  गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. अनेक छोट्यामोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख हे गाव राजकीय दृष्ट्या चर्चित आहे. मात्र, विकासाच्या दृष्टीने जैसे थेच आहे.

  हे ही वाचा : अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आईचा बेल्टने आवळला गळा, प्रेयसीनेही केली मदत

  वडाळी देशमुख येथील छत्रपती शिवाजीनगर बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले असून नदीला पूर आला की संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटतो. गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीत. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नागरिकांना नदी पार करावी लागते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bhandara Gondiya, Death

  पुढील बातम्या