Home /News /maharashtra /

ट्रक-टिप्परची समोरासमोर धडक, आगीचा भडका उडाल्याने चालकाचा जळून मृत्यू, VIDEO

ट्रक-टिप्परची समोरासमोर धडक, आगीचा भडका उडाल्याने चालकाचा जळून मृत्यू, VIDEO

  बघता बघता ट्रकने पेट घेतला. पण वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइव्हरने बाहेर उडी मारली. मात्र...

बघता बघता ट्रकने पेट घेतला. पण वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइव्हरने बाहेर उडी मारली. मात्र...

बघता बघता ट्रकने पेट घेतला. पण वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइव्हरने बाहेर उडी मारली. मात्र...

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा,06 जुलै : भंडारा-तुमसर राज्य मार्गावर (Bhandara-Tumsar State Highway) दोन ट्रकमध्ये  (truck accident) भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. त्यामुळे आगीत ड्राइव्हरही जळून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वेळीच ट्रकच्या बाहेर न येता आल्यामुळे ड्रायव्हरचा मृत्यू झाला. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एका गाडीतील ड्राइव्हरचा जळून  मृत्यू झाला. पण दुसऱ्या ट्रकच्या ड्राइव्हर वेळीच बाहेर निघाल्याने त्याचे प्राण वाचले आहे. दाबा गावाजवळ कोळसा भरून जात असलेला ट्रकला भरधाव येणाऱ्या टिप्पर ट्रकने समोरासमोर जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर स्पार्क होऊन कोळसा भरलेला ट्रकला आग लागली. बघता बघता ट्रकने पेट घेतला. पण  वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइव्हरने बाहेर उडी मारली.  मात्र टिप्पर ट्रकचे कॅबीन अपघातानंतर दार बंद झाले, त्यामुळे  ड्राइव्हर अडकला होता. त्यामुळे त्याचा जळून मृत्यू झाला. (पेण, पनवेल, उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार; भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती) घटनेची माहिती वरठी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर धाव घेऊन  अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. वरठी पोलिसांचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान या अपघातानंतर भंडारा-तुमसर मार्गावरिल वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कार दुचाकीचा अपघात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू दरम्यान, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर -बपेरा राज्यमार्गावर चुल्हाड गावाजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातात पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. संजय अम्बुले (वय वर्ष 51 वय) असं मृतक पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तर अशोक सुखराम पारधी (वय वर्ष 45) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दोन्ही दुचाकीस्वार बपेराकडून तुमसर च्या दिशेने जात असतांना दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारसोबत समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धड़क इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार चुल्हाड येथील पशु वैद्यकीय डॉक्टर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला गंभीर जखमी झाला असून त्याला तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिहोरा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या