नेहाल भुरे, (भंडारा) 27 जानेवारी : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. काल (दि.26) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पतंग उडविण्याची हौस पूर्ण करण्याच्या नादात एका बालकाच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकल्याने गळा कापून यात गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरत तुळशीदास तोंडरे (वय 14) रा.लाखांदूर असे जखमी बालकांचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यीतल लाखांदूर गावात पतंग उडवून तुटलेला दोरा रस्त्यावर लटकत होता. कुदरत तोंदरे हा बालक मोटारसायकलने घराकडे जात असताना लाखांदूर येथील वन परिक्षेत्र कार्यालयासमोर पतंगाचा मांजा लावलेला धागा कुदरतच्या गळ्याला आडवा लागला.
हे ही वाचा : मुलाच्या मृत्यूचा बदला, जादूटोण्याचा संशय अन् चुलत भावांनीच भावासह 7 जणांना संपवलं
यात मांज्याने कुदरतच्या गळ्याला चिरून टाकल्याने गंभीर दुखापत झाली. यात तो रक्तबंबाळ होऊन रडत असताना मदत मागत होता. याच दरम्यान वन विभागाचे वनरक्षक खंडागळे हे कार्यालयात जात असताना कुदरत रस्त्यावर रडताना बघून थांबले असता सदर घटनेची माहिती होताच त्यांनी प्रथम गळ्यातून सुरू असलेला रक्तस्त्राव थांबविण्यासाठी गळ्याला रुमाल बांधला व त्वरित डॉ. ठाकरे यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात कुदरातच्या गळ्याला सात टाके लागले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद शहरात मांज्यामुळे बऱ्याचजणांना दुखापत
औरंगाबाद शहरात मांजामुळे गळा चिरला गेल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. यातील एका तरुणाच्या गळ्याला दहा टाके लागल्याने त्याच्यावर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान रविवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे आणि पतंग उडविण्याच्या नादात अनेकजण जखमी झाले. एकट्या घाटी रुग्णालयात दहा जणांनी उपचार घेतले.
हे ही वाचा : पुणे हत्याकांडात नवा ट्वीस्ट, भीमा नदीत सापडलेल्या मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन
नायलॉन मांजामुळे एका मुलाच्या बोटांना, एका व्यक्तीच्या हनुवटीला, तर एका तरुणाच्या पायाला जखम झाली. याबरोबर इतर काही रुग्णही घाटीत आले. परंतु कोणीही गंभीर जखमी नसल्याने, यापैकी कोणालाही उपचारासाठी दाखल करावे लागलेले नाही, असे घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Crime, Crime news, Police