भंडारा गोंदियात 49 ठिकाणी होणार फेरमतदान

भंडारा गोंदियात 49 ठिकाणी होणार फेरमतदान

ठिकठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

  • Share this:

भंडारा, 29 मे : भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम बिघाडाच्या घोळानंतर अखेर 49 ठिकाणी फेरमतदान होणार आहे.

भंडाऱ्यात गोंदियात काल सोमवारी मतदान पार पडले. मात्र, ठिकठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. जवळपास 75 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. त्यापैकी  35 ठिकाणी तक्रारी सोडवू शकलो नाही, त्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं अशी माहिती  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वालसकर यांनी न्यूज18 लोकमतला दिली होती.

अखेर आज निवडणूक आयोगाने एकूण 49 ठिकाणी फेरमतदान करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे, ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाचा टक्का घसरलाय.

First published: May 29, 2018, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading