नरेंद्र मते, प्रतिनिधी
भंडारा, 22 जानेवारी : भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला होता. यावर चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकाला निलंबित करण्यात आले आहे. तर एकाची बदली करण्यात आली तर तिघांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल अखेर सादर केला आहे.
या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकावर ठपका ठेवण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर एकाची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 जणांचा सेवा ही समाप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का, हे पाहण्याचे ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती. शनिवार 9 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.
त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बाळ वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.