'माझ्या लेकीला तरी पाहू द्यायचे हो', काळजाचे पाणी करणाऱ्या आईचा आक्रोश

'माझ्या लेकीला तरी पाहू द्यायचे हो', काळजाचे पाणी करणाऱ्या आईचा आक्रोश

नातेवाईक आणि पालकांनी आपल्या नवजात लेकराच्या मृत्यूमुळे रुग्णालयाच्या आवारात अश्रूना वाट मोकळी करून दिली.

  • Share this:

भंडारा, 09 जानेवारी : 'माझी सात दिवसांची मुलगी होती हो, आता कळलं ती गेली आहे, आम्हाला आणायला सुद्धा जाऊ दिले नाही' मन सुन्न करणारी वाक्य आहे भंडारा सामन्य रुग्णालयात ( Bhandara District General Hospital) मृत पावलेल्या मुलीच्या आईचे. या आईप्रमाणे इतर नातेवाईक आणि पालकांनी आपल्या नवजात लेकराच्या मृत्यूमुळे रुग्णालयाच्या आवारात अश्रूना वाट मोकळी करून दिली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे 10 बाळांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात तर परिस्थितीत याहूनही बिकट आहे. आपल्या लेकराच्या मृत्यूमुळे आई आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

'रात्री नर्स आली आणि तिने धूर जमला असल्याचे सांगून आम्हाला खाली जाण्यास सांगितले. मग आम्ही सगळे खाली पळत आलो. मग तिथे अर्धातास थांबलो होतो. माझ्या बाळाबद्दल मला काहीच सांगितले नव्हते, आता कळलं बाळ दगावले आहे, असं सांगत एका आईला आपले अश्रू आवरता आले नाही.

'आम्हाला काहीच कळलं नाही. आमच्या बाळासोबत काय घडले हे आम्हाला माहिती नव्हते. आता आम्हाला कळले की बाळ दगावले आहे. जेव्हा आग लागली होती तेव्हा जीव धोक्यात घालून बाळाला आणायला गेलो होतो. पण त्यांनी आम्हाला काही जाऊ दिले नाही. कारण तिकडे खूप धुर पसरला होता. मला मुलगी झाली होती. सव्वा किलो तिचे वजन होते, माझ्या लेकराला तरी पाहू द्यायचे असते' असं सांगत एका आईने आक्रोश केला.

तर ' आग लागल्यानंतर अचानक आम्हाला दुसरीकडे घेऊन गेले होते. तिथे थांबवण्यात आले होते. नंतर आम्हाला आमच्या वार्डामध्ये जाण्यास सांगितले होते. नंतर कळलं की माझ्या मुलीचा मृत्यू झाला. अजूनही माझ्या मुलीचे शव मला देण्यात आले नाही, असं एका मृत मुलीच्या वडिलांनी आपल्या व्यथा मांडली.

'गेल्या दहा दिवसांपासून माझ्या मुलीला दूध पाजण्यासाठी जाऊ दिले नाही.  आमची लेकरं या घटनेत मेली. पण या घटनेत कुणीही डॉक्टर, नर्स का मेले नाही, असा संतप्त सवाल नातेवाईकांच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.

अपघातात मृतांची यादी

1) वंदना मोहन शेडाम, रावनवाडी, भंडारा

 - यांची सात दिवसांची मुलीचा मृत्यू

2) योगीता विकेष धुळसे, श्रीनगर भंडारा

- एक दिवसांचा मुलाचा मृत्यू

3) प्रियंका जयंती बसूशंकर, जाम भंडारा

एक महिन्याची मुलगी

4) कविता बारेलाल कुमरे, लेंडेझरी खापा भंडारा

तीन दिवसांचा मुलगी मृत्यू

5) सुकेशनी धर्मपाल आगरे, उसरला, भंडारा

12 दिवसांची मुलगी मृत्यू

6) दुर्गा विशाल रहांगडाले, डाकला

- 10 दिवसांची मुलगी मृत्यू

7) गिता विश्वनाथ बैरे, गोजापूर, भंडारा

- 2 महिन्याची मुलगी मृत्यू

8) हिरकन्या हिरालाल भानारकर, उजगाव साकेली

- सात महिन्याची मुलगी मृत्यू

Published by: sachin Salve
First published: January 9, 2021, 1:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading