मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भंडारा जळीतकांड प्रकरणाला 16 दिवस पूर्ण, अद्याप गुन्हा दाखल नाही!

भंडारा जळीतकांड प्रकरणाला 16 दिवस पूर्ण, अद्याप गुन्हा दाखल नाही!

या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकावर ठपका ठेवण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकावर ठपका ठेवण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकावर ठपका ठेवण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    नागपूर, 25 जानेवारी : संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीतकांड प्रकरणी ( Bhandara District General Hospital) नवीन माहिती समोर आली आहे. घटना घडून आज 16 दिवस पूर्ण झाले तरी अजूनही कुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतरही कुणावरही फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. 09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या प्रकरणाला 16 दिवस लोटूनही गुन्हा दाखल नाही. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक यांनी दोषींवर भारतीय दंड संहिता 304, A 34 अंतर्गत पोलिसांमार्फत नॉनबेलेबल गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे शंका उपस्थित होत आहे. खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक विशेष म्हणजे, या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल अखेर सादर केला. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकावर ठपका ठेवण्यात आला असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर एकाची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 जणांचा सेवा ही समाप्त करण्यात आली आहे. ‘जय श्रीराम’च्या नाऱ्यावर चिडू नये, सेनेचा ममतादीदींना सल्ला आणि भाजपवरही टीका तर दोषींवर 10 निष्पाप मुलांचा जीव घेतला म्हणून मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा मात्र तस अद्यापही झालं नाही त्यासाठी भाजपच्या वतीने 15 जानेवारीपासून साखळी उपोषणी सुरू आहे.  दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 25 जानेवारीला धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या