मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आयसोलेशन वॉर्डमध्ये अवघ्या 4 दिवसांत 50 वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या, प्रशासन हादरलं

आयसोलेशन वॉर्डमध्ये अवघ्या 4 दिवसांत 50 वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या, प्रशासन हादरलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जिल्ह्यात पहिल्यांदाच आयसोलेशन वॉर्डांमध्ये अशा पद्धतीने घटना घडल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

प्रविण तांडेकर,भंडारा, 17 ऑगस्ट : भंडारा जिल्ह्याच्या आयसोलेशन वार्डमध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आयसोलेशन वॉर्डांमध्ये अशा पद्धतीने घटना घडल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेलं आहे. तसेच एका 50 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडा ( बु. ) येथील 50 वर्षीय पुरुषाला चार दिवसाआधी कोरोनाचे लक्षण असल्याने भंडारा येथील असोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले होते. त्यानंतर सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्राप्त माहितीनुसार आत्महत्या केलेला व्यक्ती हा रुग्णालयात भरती झाल्यापासूनच तणावात होता. मात्र तो कोरोनामुळे तणावात होता की कौटुंबिक किंवा इतर गोष्टींमुळे तणावात होता याची माहिती मिळू शकली नाही.

कोरोना वॉर्डातील व्यक्ती आज सकाळी बाथरूम गेले असता त्यांना सदर व्यक्ती हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करून या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले नव्हते. मात्र या व्यक्तीने आत्महत्या केली असल्याने पहिल्यांदाच शवविच्छेदन करावे लागणार आहे. तसंच काल रात्री भंडारा तालुक्यातील एका 50 वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. या दोन मृत्यू नंतर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या 7 झाली आहे. मागील 7 दिवसात कोरोना वार्डात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मागील सात दिवसांपासून दररोज एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याने आता भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Coronavirus