नेहाल भुरे(भंडारा), 30 नोव्हेंबर : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरासमोरील परीसरात खेळायला गेली असताना बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय श्रध्दा किशोर सिडाम या बालिकेचा शोध लागला आहे. तीचा जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळला आहे. ही घट घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथे उघडीस आली.
मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे (दि.28) सोमवार पासून बेपत्ता होती. साकोली पोलीस घटनास्थळी पोहचले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत साकोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.
हे ही वाचा : 14 वर्षांच्या मुलीचे भयावह कृत्य, 5 वर्षांच्या बहिणीचा ब्लेडने कापला गळा, जालना हादरलं
साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील श्रध्दा किशोर सिडाम तिसऱ्या वर्गात शिकत होती. अचानक (दि.28) सोमवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र बाहेर खेळायला गेली परंतु घरी परत आली नाही. याबाबत शोधाशोध केली असता ती सापडली नसल्याने तिच्या पालकांनी उशिरा घटनेची माहिती साकोली पोलीस विभागाला देण्यात आली.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे 10.30 वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले. शोधमोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही त्या मुलीचा पत्ता लागला नाही अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांना दिसला.
हे ही वाचा : बारामती हादरली, मुलगी पळून गेल्याचा राग अनावर; प्रियकराच्या भावासोबत धक्कादायक कृत्य
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली असून पोलिस श्वान पथकासह घटनास्थळ गाठले असता श्रद्धाचा मृतदेह असल्याचे पुढे आले आहे. आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Crime, Crime news