एका चुकीमुळे कपाळावरील कुंकू पुसलं, पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल

एका चुकीमुळे कपाळावरील कुंकू पुसलं, पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल

देशात अशी गुन्हा नोंद होण्याची पहिली घटना असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष भंडारा जिल्ह्याकडे वळाले आहे.

  • Share this:

प्रवीण तांडेकर, भंडारा, 5 ऑक्टोबर : एका चुकीमुळे कसं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊ शकतं हे दाखवणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णालयात भरती न करता रुग्णाला घरी नेल्याने उपचाराविना त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्हाच्या लाखांदूर येथे घडली आहे. देशात अशी गुन्हा नोंद होण्याची पहिली घटना असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष भंडारा जिल्ह्याकडे वळाले आहे.

लाखांदूर येथे एका व्यक्तीच्या 28 सप्टेंबर रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सदर रुग्णाला भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्याची सूचना त्याच्या पत्नीला देण्यात आली होती. मात्र पत्नीने आपल्या कोरोनाबाधित पतीला दवाखान्यात घेवून जाण्याऐवजी चक्क घरी नेले. दरम्यान घरी त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

त्यानंतर तालुका वैद्यकीय अधीक्षक यांच्या तक्रारीवरून त्या मृतक कोरोनाबाधित व्यक्तीच्या पत्नीविरोधात रुग्णाप्रती हयगय व निष्काळजीपणाचे कृत्य केल्याच्या ठपका ठेवत कलम 188 प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून देशात अशा प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची पहिली घटना आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस या जागतिक संकटाशी लढताना हलगर्जीपणा केल्यास ते तुमच्यासह तुमच्या नातलगांच्याही जीवावर बेतू शकतं. भंडारा जिल्ह्यातील घटनेनंही हेच अधोरेखित झालं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 5, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या