भंडारा पोटनिवडणुकीत प्रफुल्ल पटेल रिंगणात, नाना पटोलेंना धक्का

भंडारा पोटनिवडणुकीत प्रफुल्ल पटेल रिंगणात, नाना पटोलेंना धक्का

  • Share this:

भंडारा, 03 मे : भंडारा-गोंदिया मतदारसंघातली पोटनिवडणूक नुकतेच काँग्रेसवासी झालेले नाना पटोले लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असताना आता राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ही निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी तसं ट्विट केलंय.

नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसह विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केलीये. या आघाडीमुळे भंडाऱ्यात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.  पोटनिवडणूक लढवण्याची घाई झालेल्या नाना पटोले यांना हा धक्का मानला जातोय. या प्रकरणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

First published: May 3, 2018, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading