Home /News /maharashtra /

Bhandara : 12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला अन् परतचा नाही, वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

Bhandara : 12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला अन् परतचा नाही, वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला अन् परतचा नाही, वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला अन् परतचा नाही, वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

Youth drowned in river: बारावीचा निकाल लागल्यावर सेलिब्रेशनसाठी मित्रांसोबत गेलेल्या निखिलचा नदीच बुडून मृत्यू झाला आहे.

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 9 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC result 2022) 8 जून रोजी जाहीर झाला. परीक्षेचा निकाल लागल्यावर पास झाल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन (celebration) सुरू केलं. अशाच प्रकारे भंडाऱ्यातील (Bhandara) 17 वर्षीय निखिल सुद्धा आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला. परीक्षेत पास झालेला निखिल मात्र, आयुष्याच्या स्पर्धेत नापास झाला. कुठं घडली घटना? बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रा सोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या यूवकाचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू (17 year old youth drowned) झाल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माड़गी रेल्वे पुलाखाली ही घटना घडली आहे. निखिल महादेव बालगोटे वय 17 वर्ष राहणार गुरूनानक नगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? बारावीचा निकाल लागला असून मृतक निखिलला 57 टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागताच मित्रांसोबत माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. दरम्यान त्यांना पाण्याचा मोह आल्याने त्यांनी पोहन्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान निखिल हातपाय धून्याकरिता पाण्यात गेला असता त्याच्या तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला. वाचा : तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी निखिल बुडत असल्याचे पाहून त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना पाचारण केले खरे मात्र निखिल बुडाला. घटनेची माहिती तुमसर पोलिसाला मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक निखील याचा शोध नदीपात्रात सुरु केला. त्यानंतर सुमारे दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदना करिता तुमसर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला असुन पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे. 12 वीच्या परीक्षेत पास झालेला निखिल मात्र दुर्देवाने जीवनाच्या परिक्षेत नापास झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, कोकण विभागाचा निकाल 97.21% इतका लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 90.91 टक्के इतका लागला आहे. 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 1356604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Exam result, HSC

    पुढील बातम्या