Home /News /maharashtra /

भाईंचंद रायसोनी बँक घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई, 11 जणांना घेतले ताब्यात

भाईंचंद रायसोनी बँक घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई, 11 जणांना घेतले ताब्यात

यामध्ये तेलगी घोटाळ्याचा आरोपी अंतिम तोतला याची पत्नी आणि भावाला अटक केली आहे.

जळगाव, 17 जून :   भाईचंद हिराचंद रायसोनी बँक घोटाळा (Bhaichand Hirachand Raisoni Bank)  प्रकरणी मोठी कारवाई सुरू झाली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं (Pune Crimes Branch) 11 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तेलगी घोटाळ्याचा आरोपी अंतिम तोतला याची पत्नी आणि भावाला अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या भाई हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्या प्रकरणी अखेर  पुणे आर्थिक गुन्हे  शाखेना कारवाईचा बडगा उगारला आहे. बी एच आर पतसंस्था प्रशासक यांच्याशी संगनमताने पतसंस्थाची जमीन घेतली कवडीमोल किंमतीत विकली होती. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यापारी तसेच राजकीय जवळीक असलेल्या 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास Mucormycosisचा धोका नाही? भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे.  या पतसंस्थेमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या पतसंस्थेनं जप्त केलेल्या मालमत्ता अगदी कवडीमोल किंमतीत विकल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कागदपत्र जप्त केली. या प्रकरणी पोषण आहाराचे मोठे ठेकेदार सुनील झंवर यांच्या कार्यालायचीही झडती घेण्यात आली होती. ओळखा पाहू हा आहे तरी कोण? अभिनेत्याची विविध रुपं पाहून तुम्ही देखील व्हाल दंग याआधीही 'बीएचआर'च्या अपहार प्रकरणी राज्यभरात चेअरमनसह अनेकांवर गुन्हे दाखल आहे. त्यानतंर या संस्थेवर पाच वर्षांपासून अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीवरुन पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवसायकासह, कर्जदार, ठेवीदार संघटनाचे पदाधिकारी व संस्थेच्या जागा लिलावात घेणाऱ्या उद्योजकांकडे छापे टाकले होते. या प्रकरणात मोठे उद्योजक, राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या