मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच भाई जगताप यांनी केला गौप्यस्फोट

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच भाई जगताप यांनी केला गौप्यस्फोट

Mumbai Municipal Corporation election: मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी (Mumbai Congress President) निवड झाल्यानंतर भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आता भाजप (BJP) विरोधात दंड थोपाटले आहेत. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यालाही पाठिंबा दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 डिसेंबर: मुंबई महापालिका निवडणुकांवरून (Mumbai Municipal Corporation election) राज्यातलं राजकीय वातारण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते आणि भाजपचे (BJP) नेते यांच्यातलं शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचलं आहे. आता या शाब्दिक युद्धात मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष (Mumbai Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांनीही उडी घेतली आहे. भाजपचे काही नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाई जगताप यांनी आता भाजप विरोधात दंड थोपाटले आहेत. ते एका मुलाखतीत म्हणाले की 'अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी दम असतो. त्यामुळं त्यांचे पत्ते त्यांना खोलू द्या, मग बघू पुढे काय होतंय ते. असे अनेक पत्ते आम्हीही आमच्या छातीजवळ धरले आहेत. वेळ येईल तेव्हा आम्हीही आमचा पत्ता खेळू,' असं म्हणतं भाई जगताप यांनी भाजपच्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं आहे. भाजपचे प्रमुख नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून महाराष्ट्रात भाजपला गळती लागेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अशातच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपचे 10 पेक्षा अधिक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. भाजपचे काही नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं अजित पवारांनीही सांगितलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातलं राजकारण एकंदरीतच आंधळी कोशिंबीरीसारखं झालं आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे आणि कोण कोणाच्या गळाला लागणार आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या भाषणबाजीमुळं राजकीय वर्तुळ मात्र ढवळून निघत आहे.
First published:

Tags: Politics

पुढील बातम्या