भाईंचंद रायसोनी बँक घोटाळ्या प्रकरणी पोलिसांवर दबाव, अनेक राजकीय नेते रडारवर?

भाईंचंद रायसोनी बँक घोटाळ्या प्रकरणी पोलिसांवर दबाव, अनेक राजकीय नेते रडारवर?

अनेक मोठी राजकीय नावं वगळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईतील एचा मोठ्या अधिकाऱ्यांने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 28 नोव्हेंबर : भाईचंद हिराचंद रायसोनी बँक घोटाळा (Bhaichand Hirachand Raisoni Bank)  प्रकरणाला नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थावर कारवाई करण्यात आली आहे. या पतसंस्थेमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या पतसंस्थेनं जप्त केलेल्या मालमत्ता अगदी कवडीमोल किंमतीत विकल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कागदपत्र जप्त केली आहे. या प्रकरणी पोषण आहाराचे मोठे ठेकेदार सुनील झंवर यांच्या कार्यालायचीही झडती घेण्यात आली आहे.

स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!

दरम्यान, वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांकडून कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे.  अनेक मोठी राजकीय नावं वगळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईतील एचा मोठ्या अधिकाऱ्यांने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.  त्यामुळे पुणे पोलिसांवर दबाव टाकला जात आहे, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

शुक्रवारी जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीवर आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. आर्थिक फसवणूक तसेच पाच वर्षांपासून अवसायकाच्या नेमणुकीच्या काळात झालेला अपहारासह ‘बीएचआर’च्या कोट्यवधींच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली.

IND vs AUS : शतक ठोकणारा स्मिथ म्हणतो, '3 दिवसांपूर्वी काहीतरी झालं आणि...'

सकाळी सात वाजता अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजी नगरातील घरी पथक धडकलं. उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी तेथे घराची झडती घेतली. तसेच संस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात देखील पथक दाखल झाले. येथे 45 जणांच्या पथकाने चौकशीचे सूत्र हाती घेतले. त्याशिवाय उद्योजक सुनील झंवर, पतसंस्था ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे आदींच्या निवासस्थानी देखील तपासणीसह झाडाझडती करण्यात आली.

'बीएचआर'च्या अपहार प्रकरणी राज्यभरात चेअरमनसह गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानतंर या संस्थेवर पाच वर्षांपासून अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीवरुन शुक्रवारी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवसायकासह, कर्जदार, ठेवीदार संघटनाचे पदाधिकारी व संस्थेच्या जागा लिलावात घेणाऱ्या उद्योजकांकडे छापे टाकले.

Published by: sachin Salve
First published: November 28, 2020, 10:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या