मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंकजा मुंडेंची नाराजी दूर? भागवत कराड उद्या गोपीनाथगडावर!

पंकजा मुंडेंची नाराजी दूर? भागवत कराड उद्या गोपीनाथगडावर!

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा उद्या 16 तारखेला परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात करणार आहेत.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा उद्या 16 तारखेला परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात करणार आहेत.

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा उद्या 16 तारखेला परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात करणार आहेत.

बीड, 15 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्यामुळे भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde ) आणि खासदार प्रीतम मुंडे या नाराज झाल्या होत्या. मराठवाड्यातून प्रीतम मुंडे (pritam munde) ऐवजी भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. आता या वादाचा शेवट बीडमध्येच गोड करण्याचा भाजपने प्लॅन केला आहे. उद्या भागवत कराड (bhagwat karad) यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथगडावरून सुरू होणार आहे. खुद्द पंकजा मुंडे याच हिरवा झेंडा दाखवणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा उद्या 16 तारखेला परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात करणार आहेत. विशेषतः खुद्द पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखविणार असून खासदार डॉ प्रीतम मुंडे देखील उपस्थिती लावणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. खा. प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने बीडमधील मुंडे समर्थकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.  मात्र त्याच पार्श्वभूमीवर नाराजी दूर करण्यासाठीचा तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि भागवत कराड यांच्यात सर्व काही आलबेल आहे, अशी चर्चा केली जात होती. परंतु, आता स्वतः पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या यात्रेस सुरुवात होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. थर्ड अंपायरने आऊट देण्याऐवजी सुरू केलं भलतच काही, मोठ्या स्क्रीनवर दिसला VIDEO दरम्यान, त्याच दिवशी अकरा वाजता बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आल्यानं पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर लक्ष राहणार आहे.
First published:

पुढील बातम्या