गडचिरोली, 31 जुलै : क्रिकेटवर बेटिंग (betting) लावण्याचे प्रकार आपण ऐकले असतील पण आता जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवरही (Tokyo Olympics 2021) बेटिंग लावण्याचा प्रकार समोर आला आहे. गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात सक्रिय असलेल्या बी-टेक्स 1 को आणि नाईस 777 नेट या ऑनलाईन जुगार प्लॅटफार्मवर जुगार खेळणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
आष्टी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता ते ऑनलाईन जुगाराचे बुकी म्हणून काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी चंद्रपूर येथील मुख्य वितरक राकेश कोंडावार, रजिक अब्दूल खान आणि महेश अल्लेवार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख वितरक म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाल्यावरून सर्व आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्लेखनीय आहे की, या ऑनलाईन जुगाराची व्याप्ती आंतरराष्ट्रीय असून तिचे धागे गडचिरोलीपर्यंत पसरले आहेत. आयपीएल, फुटबॉलसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकाराशी हा जुगार संबंधित असून सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही याद्वारे बेटिंग केली जात असल्याची माहिती मिळाली.
ऑलिम्पिक स्पर्धा, आयपीएल, फुटबॉलसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात बेटिंग करण्यात या टोळीचा समावेश असून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असल्याचा अंदाज आहे. सध्या सुरू असलेल्या ऑलिपिंक स्पर्धेतही याद्वारे बेटिंग लावण्यात आली आहे.
पोलिसांनी धाड टाकून आरोपीकडून 21 लाख 33 हजार रोख रकमेसह दहा मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.