स्थापन होताच सरकार येणार धोक्यात, सट्टाबाजारातील अंदाजाने खळबळ

स्थापन होताच सरकार येणार धोक्यात, सट्टाबाजारातील अंदाजाने खळबळ

राज्यात सर्वांचे लक्ष सरकार स्थापनेकडे लागलं असून सट्टाबाजारातील अंदाजाने सर्व आमदारांना इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर : राज्यात निव़डणुकांचा निकाल लागून आठवडा होत आला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेत संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. अद्याप दोघांमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सकारात्मक चर्चा दिसत नाही. त्यामुळे राज्यात कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. याशिवाय सत्ता स्थापनेसाठी अनेक वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळवून शक्यता वर्तवल्या जात आहेत. सट्टा बाजारातही मोठी उलाढाल होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील सट्टा बाजारात सरकार कोण स्थापन करणार यावर सट्टा लावला जात आहे. यातच महाराष्ट्रात एका वर्षाच्या आता पुन्हा विधानसभा निवडणुका होणार यावरही सट्टा लावला जात असल्याचं वृत्त नवभारत टाइम्सने दिलं आहे. शुक्रवारी सट्टा बाजारात स्थिर सरकारचा भाव 20 रुपये इतका होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याचं वातावरण पाहता जरी कोणाचं सरकार सत्तेत आलंच तरी ते काही महिनेच टिकेल असं सट्टेबाजांना वाटतं. त्यामुळे 2020 मध्ये राज्यात पुन्हा निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातील राजकीय घडामोडींवर नोकरशहांचीसुद्धा नजर आहे.

सध्या मुंबईचे पोलिस महासंचालक संजय बर्वे यांना सेवेत तीन महिन्यांची मुदतवाझ मिळाली होती. ती 30 नोव्हेंबरला संपणार आहे. तेव्हा आणि आताही असंच म्हटलं जात आहे की, जर भाजपचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचे राहिले तर बर्वे यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळू शकेल. राज्यात कोणाचं सरकार येणार यावर बर्वे यांना आणखी एक मुदतवाढ मिळणार की नाही हे ठरेल.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याजागी दुसऱ्या कोणाची वर्णी लागली तर बीएमसीमध्ये प्रवीण परदेशी यांच्या जागी दुसरे कमिश्नर येतील असं नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की प्रत्येक सरकार काही खास पदांवर त्यांचे खास अधिकारी ठेवते यात काही वेगळं नाही. यामुळे येत्या दिवसात फक्त सरकारमध्येच नाही तर वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी पदांमध्येही उलथापालथ बघायला मिळू शकते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO

First published: November 2, 2019, 3:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading