मुंबईत कोरोनाचा आणखी एकाचा बळी, SRV हॉस्पिटलमध्ये बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईत कोरोनाचा आणखी एकाचा बळी, SRV हॉस्पिटलमध्ये बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनामुळे एका बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनामुळे एका बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.  एक एप्रिल रोजी या कर्मचाऱ्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील टिळक नगर येथील  SRV हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. बेस्टमध्ये तांत्रिक विभागात हा कर्मचारी काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा...मराठवाड्यातल्या मदत केंद्रातून तेलंगणाचे 465 मजूर पळाले, प्रशासनाची झोप उडाली

दरम्यान,  मुंबई, पुण्यातील मिळून आज 110 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत आज 66 तर पुण्यात 44 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्या आतापर्यंत 2801 वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला...

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या धारावीमध्ये आज आणखी 5 नवे रुग्ण सापडले आहे. तर दादर परिसरातही 2 रुग्ण आढळले आहे.

कोरोनाचं व्हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी धारावीत नवे पाच रुग्ण सापडले आहे. हे पाचही जण मुकुंदनगरमध्ये सापडले आहे.

हेही वाचा..कोण म्हणतंय कोरोनाला हरवू शकत नाही?वडिलांना पक्षघात असतानाही आई-मुलाने जग जिंकलं

धारावीतील मुकुंदनगरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले असून आकडा हा 14 वर पोहोचला आहे तर संपूर्ण धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 60 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दादर परिसरातही आज 2 नवे रुग्ण आढळले आहे. शिवाजी पार्क परिसरात हे दोन्ही रुग्ण आढळले आहे. यात एका 75 वर्षीय महिला तर 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दादरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 21 वर पोहोचली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 15, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या