नागपूर, 11 मे: बेंगळुरूवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपूरमध्ये लँन्डिंग करावे लागले. विमानात झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ही घटना रात्री दीडच्या हे लँडिंग करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानामध्ये झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दुसरे विमान बोलवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पण रात्रीपासून प्रवासी नागपूर विमानतळावरच आहेत. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवासी अजूनही नागपूर विमानतळावर ताटकळत थांबले आहेत.
दिल्लीला जाणारे दुसरे विमान कधी येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
VIDEO: हेल्मेट न घालणाऱ्या मुंबई पोलिसाची दादागिरी, प्रश्न विचारणाऱ्या तरुणालाच झापलं