मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Belgaum Loksabha Bypoll : बेळगावात भाजप आघाडीवर, म.ए.समिती पिछाडीवर, सेनेला धक्का

Belgaum Loksabha Bypoll : बेळगावात भाजप आघाडीवर, म.ए.समिती पिछाडीवर, सेनेला धक्का

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.

  • Published by:  sachin Salve
assबेळगाव, 02 मे : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Belgaum Loksabha Bypoll 2021) मतमोजणी सुरू आहे. निकालाचे कल आता हाती येत आहे. भाजपचे उमेदवार मंगला अंगडी (Mangala Angadi)यांनी मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी पिछाडीवर आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली. टपाली मतांची मोजणीनंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपचे उमेदवार मंगला अंगडी यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली असून ती अजूनही कायम आहे. आतापर्यंत 10 लाखांपैकी अडीच लाख मतमोजणी पूर्ण झाली आहे. राहुल द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO मंगला अंगडी यांना 127623 मतं मिळाली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 117288 मतं मिळाली आहे. मराठी एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके 32703 मतं मिळाली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 26 वर्षांच्या शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक मतमोजणी : पहिल्या दोन तासांतल्या 6 मोठ्या घडामोडी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती. दुसरीकडे भाजपनेही या ठिकाणी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी पाहण्यास मिळाली आहे.
First published:

Tags: Assembly Election 2021

पुढील बातम्या