मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची उघड नाराजी! म्हणाल्या इतक्या गंभीर प्रश्नावर शिंदे-फडणवीस...

मुख्यमंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची उघड नाराजी! म्हणाल्या इतक्या गंभीर प्रश्नावर शिंदे-फडणवीस...

मुख्यमंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची उघड नाराजी!

मुख्यमंत्र्यांवर सुप्रिया सुळेंची उघड नाराजी!

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाचे पडसाद आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादचा परिणाम आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाला. एकीकडे ठाकरे गटाच्या खासदारांनी हातात पोस्टर घेऊन सभागृहाबाहेर आंदोलन केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात केंद्राने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेत नाही हे दुर्दैव असल्याची टीका देखील खासदार सुळे यांनी केली.

काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

जे सध्या घडतंय ते दुर्दैव आहे. भारतात भारतात अनेक राज्य असून केंद्र सरकार आणि राज्यांची नाती चांगली असली पाहिजेत. राज्यांचे संबंध चांगले हवेत. दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे, मग हा वाद व्हायचे कारण काय? शिंदे गटाचे खासदार आज होते की नाही मला माहित नाही. महाराष्ट्र राज्याच्या विषयाबाबत एकी दाखवली गेली नाही. यावर तातडीने सर्वपक्षीय बैठक व्हायला हवी. मी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे वेळ मागितली आहे. उद्या 12.40 ची वेळ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना खासदार आम्ही उद्या शाह यांना भेटणार आहे. इतक्या गंभीर प्रश्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेत नाहीत, हे दुर्दैव असल्याचंही खासदार सुळे म्हणाल्या. संजय राऊज यांच्यासंदर्भात विचारले असता जे विरोधात बोलतील त्यांना जेल होत आहे. हे दडपशाहीचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक वाद, देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये, थेट अमित शाहंनाच केला फोन

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील बेळगावी आणि इतर काही मराठी भाषिक गावांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची मागणी महाराष्ट्र अनेक दिवसांपासून करत आहे. 1960 च्या दशकात राज्यांच्या भाषा-आधारित पुनर्रचनेदरम्यान हे मराठी-बहुल क्षेत्र कन्नड-बहुल कर्नाटकाला चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा महाराष्ट्राचा आरोप आहे. त्याचवेळी, सीएम बोम्मई यांनी नुकतीच महाराष्ट्रातील अक्कलकोट आणि सोलापूर या कन्नड भाषिक भागांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांतील लोकांना दक्षिणेकडील राज्यात सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचे हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत बोम्मई म्हणाले की, सीमावादावरील कायदेशीर लढाई कर्नाटक जिंकेल, असा विश्वास आहे, कारण राज्याची भूमिका कायदेशीर आणि घटनात्मक दोन्ही आहे. एवढी वर्षे जुनी ही बाब पुन्हा दोन राज्यांमधील तणावाचे कारण कशी बनली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याची सुरुवात बेळगावी येथील कन्नड विद्यार्थ्याला कथित मारहाणीपासून झाली. कॉलेज फेस्टिव्हलमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याबद्दल या विद्यार्थ्याला मराठी विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. कर्नाटक रक्षण वेदिके नावाच्या संघटनेने याचा तीव्र निषेध केला. यादरम्यान महाराष्ट्र क्रमांकाच्या अनेक वाहनांना लक्ष्य करून त्यांच्या काचा फोडल्याचे वृत्त आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Supriya sule