अघोरी !, गुप्तधनासाठी 5 चिमुरड्यांचा दिला जाणार होता बळी, पण...

अघोरी !, गुप्तधनासाठी 5 चिमुरड्यांचा दिला जाणार होता बळी, पण...

बेळगाव शहरात गुप्तधन मिळविण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळक्यापैकी एका महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

19 सप्टेंबर : बेळगाव शहरात गुप्तधन मिळविण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळक्यापैकी एका महिलेला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. तिचे चार साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकारात १४ महिन्याच्या बालिकेला वाचवण्यात यश आले आहे.

भडकल गल्लीतील ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अंधश्रद्धेचा कळस ठरली आहे. चौदा महिन्याच्या मुलीसह आणि चार बालकांना नरबळी देण्यासाठी तयारी सुरू होती.

राहत्या भाडोत्री घरातच आठ फूट खोल आठ फूट रुंद खड्डा खणला होता. चौदा महिन्याची घरमालकाच्या मुलीला बळी देण्यासाठी पकडून ठेवले होते. बऱ्याच वेळेपासून मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध करताना मुलीच्या रडण्याचा आवाज आला आणि नरबळी देण्याचा प्रयत्न फसला.

अमावस्येच्या मुहूर्तावर एकूण पाच मुलांचा नरबळी देण्याची ही  योजना होती. याबाबतीत एक महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात  आहे. मार्केट पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून अन्य चौघांचा शोध सुरू आहे.

First published: September 19, 2017, 6:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading