20 एप्रिल : बेळगावमध्ये भाजप आमदारावर गुन्हा दाखल झालाय. कर्नाटक निवडणुकीसंबंधी बोलताना ते म्हणाले, 'ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक रस्ता, गटार, पिण्याच्या पाण्याची नाही. ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी आहे. ज्यांना बाबरी मशीद बांधायची आहे, टिपू सुलतान जयंती साजरी करायची आहे, त्यांनी काँग्रेसला मतदान करावं. पण तुम्हाला शिवाजी महाराज हवे असतील, संभाजी महाराज हवे असतील, लक्ष्मीच्या देवळात पूजा करणारे हवे असतील तर तुम्ही भाजपलाच मतदान करायला हवं.'
या वादग्रस्त विधानामुळेआमदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.संजय पाटील हे बेळगाव ग्रामीणचे आमदार आहेत. आपल्या भाषणात त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.