बेळगाव, 18 जुलै: बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात घराबाहेर थांबलेल्या कारमध्ये स्फोट झाला. कारला आग लागल्यानंतर एलपीजी गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की गाडीचा वरचा भाग उडून गेला. सुदैवानं या स्फोटात जीवितहानी झाली नाही.