राहुल खंदारे,प्रतिनिधी
बुलडाणा, 04 डिसेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहे. नागपूरहून फडणवीस आणि शिंदे हे कारने शिर्डीला पोहोचणार आहे. मात्र, बुलडाण्यात मेहकर इथं स्वागतासाठी कार्यकर्ते जमलेले होते. तेव्हा एका सापाची एंट्री झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी या सापाला दगडाने ठेचून ठार मारले.
समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून निघाले होते. बुलडाण्यात ते पाहणी करणार आहे.मात्र, मेहकर येथे समृद्धी महामार्गाच्या शेजारी साप निघाला. याच ठिकाणी फडणवीस आणि शिंदे यांच्या स्वागतासाठी समृद्धी महामार्गावर गर्दी जमली होती. मेहकरजवळ बाळासाहेबांची शिवसेना गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थितीत होते.
अचानक साप निघाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. साप निघालामुळे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणावरून दूर पळ काढला. पण, स्थानिकांनी लाठ्या आणि दगडाने या सापाला ठार मारलं. सापाला ठार मारल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, या गोंधळात एका सापाचा बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
('शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता' भाजप आमदार प्रसाद लाड बरगळले)
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. शिर्डीपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी सकाळीच ते नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कारने शिर्डीकडे रवाना झाले आहे.
फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. यावेळी कारमध्ये एकनाथ शिंदे हे शेजारी बसले आहे. मर्सिडिज कारमधून दोन्ही नेत्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे. नागपूरहून शिर्डीपर्यंत दोन्ही नेते एकत्र प्रवास करत आहे. विशेष म्हणजे, याआधी जेव्हा एकनाथ शिंदे हे मविआ सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती. मर्सिडिज ईलेक्ट्रिक कारने त्यांनी प्रवाास केला होता. त्यावेळी खुद्ध शिंदे यांनी कार चालवली होती. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदाच प्रवास करत आहे. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे ज्या mercedes g wagon कारने प्रवास करत आहे, त्या कारची किंमतही दीड कोटी ते 2 कोटींच्या घरात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.