मुंबई, 22 मार्च : आज गुढीपाडवा आहे. हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस, राज्यात गुढीपाडव्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी गुढ्या उभारून मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. आज शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे बॅनर सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत.
बॅनरमध्ये नेमकं काय?
राज ठाकरे यांच्या मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनर उभारण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा अशय असलेला मजकुर छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनसेकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. राज ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेपूर्वी हे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेढून घेत आहेत.
राज ठाकरे काय बोलणार?
आज मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. सभेपूर्वी मनसेकडून या मेळाव्याचे दोन टीझर प्रसिद्ध करण्यात आले होते. या टिझरमुळे मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray