• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • चंद्रकांत पाटील यांच्या भेटीआधी राज ठाकरेंनी घेतली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक, पुढील रणनीती बाबत चर्चा

चंद्रकांत पाटील यांच्या भेटीआधी राज ठाकरेंनी घेतली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक, पुढील रणनीती बाबत चर्चा

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (maharashtra navnirman sena) अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil)यांची आज भेट होणार आहे.

  • Share this:
मुंबई, 06 ऑगस्ट: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (maharashtra navnirman sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil)यांची आज भेट होणार आहे. या बैठकीआधी राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीस अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे , शिरीष सांवत, अविनाश जाधव उपस्थित होते. या बैठकीत पुढील रणनीती बाबत चर्चा झाल्याचं समजतंय. चंद्रकांत पाटील आज भेटणार राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे भाजप आणि मनसेच्या युतीच्या (BJP MNS alliance) चर्चेला जोर आला असून चंद्रकांत पाटील यांनी ती शक्यता पूर्णतः फेटाळून लावलेली नाही. लवकरच युवासेनेला मिळणार नवा अध्यक्ष, 'या' नावाची जोरदार चर्चा राजकारणात कायमस्वरूपी कुठल्याच पर्यायावर फुली मारता येत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपल्या मनात अनेक शंका आहेत, त्या विचारायला आपण कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची परप्रांतियांविषयीची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून त्यांनी व्यापक भूमिका घ्यावी, अशी आपली इच्छा असल्याचंही ते म्हणाले.
Published by:Pooja Vichare
First published: