फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प; लोकप्रिय घोषणांचा पडणार पाऊस !

फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प; लोकप्रिय घोषणांचा पडणार पाऊस !

फडणवीस सरकारचा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प. यावेळी सरकार कोणत्या लोकप्रिय घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जून : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. त्यानंतर अर्थमंत्री ,सुधीर मुनगंटीवार हे मंगळवारी ( आज ) दुपारी अर्थसंकल्प सादर करतील. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यानं आजच्या अर्थसंकपल्पाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करेल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. सोमवारी पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली त्यावेळी शोकप्रस्ताव आणि नव्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर सभागृहाचे कामकाज बंद करण्यात आले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर 2019 – 2020चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

राज्याचा विकासदर वाढला

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था 7.5 टक्के असल्याचं म्हटलं आहे. मागील चार वर्षामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन देखील राज्याची विकासाची घोडदौड कायम असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

काय असणार अर्थसंकल्पात

विधानसभा निवडणुकीपूर्वी हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यामध्ये काय असणार? कोणत्या घोषणा केल्या जाणार? याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमिवर या अर्थसंकल्पाला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कोणत्या घोषणा करणार? शेतकरी आणि राज्यातील जनतेला काय मिळणार? हे पाहावं लागणार आहे.

VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

First published: June 18, 2019, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading