मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोमय्यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचं नवं Tweet, म्हणाले...

सोमय्यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचं नवं Tweet, म्हणाले...

सोमय्यांच्या पत्रकार परिषदे आधी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे.

सोमय्यांच्या पत्रकार परिषदे आधी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे.

सोमय्यांच्या पत्रकार परिषदे आधी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 21 फेब्रुवारी: भाजप नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे पत्रकार परिषद (press conference) घेणार आहेत. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली. सकाळी 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. मात्र सोमय्यांच्या पत्रकार परिषदे आधी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या या ट्विटला सोमय्या कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल. संजय राऊत काय म्हणाले ट्विटमध्ये किरीट... आपण हे सांगू शकाल का? वेवूर ( पालघर )येथील निरव डेव्हलपर मध्ये 260 कोटीची गुंतवणूक कोणाची आहे? येथे nikon green ville ya project मध्ये मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का.? यात कोणत्या ED joint director ची बेनामी गुंतवणूक आहे? महाराष्ट्राला कळू द्या जय महाराष्ट्र! संजय राऊतांकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. हे लोक चु# आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. किरीट सोमय्यांनी सवाल उपस्थित केला होता की, केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का? ''आम्हाला ज्ञान देण्याची...'',चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार  त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की, असं कोण म्हणालं? देशात असे चु## लोक खूप आहेत. अशा लोकांना प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा चु## लोकांना 2024 नंतर संपवून टाकेल. 2024 नंतर देशातील राजकारण अत्यंत पारदर्शक असेल. 10 मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा चु## लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते. किरीट सोमय्यांचं राऊतांना उत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांना आपण सोमवारी (21 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ. आपण उद्या आणखी घोटाळे जाहीर करु, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शायरी म्हटली. "उद्धव साहेब, सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे", असा टोला त्यांनी लगावला. "मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, किरीट भाई आपल्याला आपली संस्कृती जपायला हवी. मी मीडियासमोर सांगितलं होतं, मी चार महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने 19 बंगले बेकायदेशीरपणे बांधल्याचं म्हटलं होतं. पण मी त्यानंतर काही बोललोच नाही. आता संजय राऊतांनी तो विषय पुन्हा उकरुन काढला. उद्धव साहेब, सनम हम तो डुबेगे, पर तुझे भी लेकर डुंबेगे. म्हणून उद्धव ठाकरेंनी भाषा वापरली, बाप-बेटे जेलमध्ये पाठवतात. भुजबळांच्या बेनामी संपत्ती उघड केली म्हणून जेलमध्ये पाठवणार? त्यासाठी मला ही नोटीस पाठवली का?" असे सवाल सोमय्यांनी केले. IND vs WI : टीम इंडियाला मिळाला नवा पांड्या, हार्दिकचा मार्ग आणखी खडतर "उद्धव ठाकरे आणि त्यांचं बेनामी सरकार किती डरपोक आहे. छगन भुजबळांची 100 कोटींची बेनामी संपत्ती उघडकीस आणली, प्रसारमध्यमाने ती संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं, म्हणून शरद पवार यांनी इंटरनली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवली. उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांवर कारवाई करा. म्हणून कोविडच्या नावाने कारवाई केली जात आहे", असं सोमय्या म्हणाले.
First published:

Tags: Kirit Somaiya, Sanjay Raut (Politician)

पुढील बातम्या