विदर्भातील पठ्ठ्याची शक्कल, बिअर विक्रीचा फंडा पाहून पोलिसांनीही डोक्याला लावला हात!

विदर्भातील पठ्ठ्याची शक्कल, बिअर विक्रीचा फंडा पाहून पोलिसांनीही डोक्याला लावला हात!

. मेडिकल दुकानं अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे लॉकडाउनच्या काळात सुरू आहे.

  • Share this:

नागपूर, 15 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. या बंदमुळे तळीरामांची पुरती गैरसोय झाली आहे. नागपूरमध्ये एका पठ्ठ्याने थेट मेडिकलमधून बिअर विकण्याचा प्रताप केला आहे.

नागपूरमध्ये एका मेडिकल स्टोअर्समधून दारू विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. सेंट्रल इव्हेन्यू मार्गावरील दोसर भवन चौकात असलेल्या कांचन मेडिकल स्टोअर्सवर गणेशपेठ पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला.

हेही वाचा - सर्व दावे कोरोनापुढे फेल, उष्ण प्रदेशांमध्ये अधिक वेगाने वाढतोय प्रादुर्भाव

निशांत गुप्ता असं या दारू विक्रेत्या आरोपीचं नाव आहे. या तरुणाने दारू विक्री करण्यासाठी थेट मेडिकल दुकानाची शक्कल लढवली. मेडिकल दुकानं अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे लॉकडाउनच्या काळात सुरू आहे.

त्यामुळे निशांत याने मेडिकल दुकानात मिनर वॉटरच्या बॉक्समध्ये बिअरच्या बाटल्या लपवून आणल्या होत्या. मेडिकल दुकानातून बिअरची विक्री सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली.

त्यानंतर गणेश पेठ पोलिसांनी कांचन मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकला. या तरुणाने केलेल्या पराक्रमामुळे पोलीसही चक्रावून गेले. मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मिनर वॉटरच्या बॉक्स ठेवण्यात आले होते. जेव्हा हे बॉक्स उघडून पाहिले तेव्हा त्यात बिअरच्या तब्बल 80 बॉटल्स आढळून आल्या आहे. पोलिसांनी निशांत गुप्ता याला बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- नगरमधील अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, जिल्हाबंदीच्या आदेशावरून आरोप

याआधीही नागपूरमधील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी लॉकडाउनच्या काळात आतापर्यंत 5 ते 6 बिअरबारचे हॉटेल फोडले होते. यात लाखो रुपयांची दारू चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

संपादन -सचिन साळवे

First published: April 15, 2020, 11:00 AM IST

ताज्या बातम्या