Home /News /maharashtra /

एका हातात स्टेअरिंग दुसऱ्या हातात बिअर, एसटी बसचालकाचा VIDEO व्हायरल

एका हातात स्टेअरिंग दुसऱ्या हातात बिअर, एसटी बसचालकाचा VIDEO व्हायरल

या दोघांना एवढंही भान राहिले नाही की, सरकारी वाहन चालवताना मद्यपान करण्यास सक्त मनाई असते. तरी देखील या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून व्हिडिओ बनवला.

नागपूर, 20 मे : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी सोडण्यासाठी लालपरी अर्थात एसटी बस धावून आली आहे. पण, नागपूरच्या एसटी महामंडळाच्या बसचालक व वाहकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही धावत्या बसमध्ये बिअर पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. लॉकडाउनच्या काळात नागपुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी सोडण्याचे काम एसटी महामंडळाने हाती घेतले आहे. नागपूरच्या गणेश पेठ बस स्थानकावरुन 16 मे रोजी  22 मजुरांना घेऊन बस खवासा सीमेवर गेली होती. हेही वाचा - अजब आहे राव! चोरी करण्यासाठी मास्क ऐवजी घालून आले कलिंगड, PHOTO VIRAL मजुरांना सोडून बस नागपूरच्या दिशेनं रवाना झाली.  परत येत असताना वाटेत बसचालक विशाल मेंढे व वाहक शेंडे यांनी बसमध्येच बिअर पिऊन स्वतःचा व्हिडिओ बनवला. एवढंच नाहीतर या जेव्हा बसचालक विशाल मेंढे बस चालवत होता, तेव्हा तो स्वत: बिअर पित होते. या दोघांना एवढंही भान राहिले नाही की, सरकारी वाहन चालवताना मद्यपान करण्यास सक्त मनाई असते. तरी देखील या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मद्यपान करून व्हिडिओ बनवला आणि  तो व्हायरल केला. हेही वाचा - मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर नवीन जबाबदारी, राज्य सरकारचा मोठा निर्णय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी केलेला प्रताप हा प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारा आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गणेश पेठ डेपोचे व्यवस्थापक अनिल आमनेकर यांनी दिला आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या