हिंजवडीतील एफएमएल या हॉटेलमध्ये फिर्यादी हे मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये मौज मजा सुरू होती. त्याच वेळी वाढदिवस साजरा करत असताना (शाम्पेन) बिअरची बॉटल्सचे फवारे हवेत उडवण्यात आले, काही थेंब हॉटेलमधील बाऊन्सरच्या अंगावर पडले. यावरून फिर्यादी शुभम कचरे आणि अंगरक्षक पांडुरंग खोते यांच्यात वाद झाला. पांडुरंग खोते याने शुभम यांना शिवीगाळ करत प्लास्टिकच्या पाईप ने मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शुभम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. असून आरोपी बाऊन्सरला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड हे करत आहेत. अर्धनग्न होईन भररस्त्यावर मनोरुग्णाचा राडा दरम्यान, बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बार्शी रोडवर एका मनोरुग्णाने चांगलाच गोंधळ घातला. भररस्त्यावर मोठे-मोठे दगडं घेऊन तो चारही दिशेनं भिरकाऊ लागला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आज सकाळी शहरातील बार्शी रोड वरून लहान मुलं शाळेत जात होते. या शिवाय सकाळची वेळ असल्याने रहदारी होती. अशातच अचानक एका मनोरुग्नाने जोरात ओरडत गोंधळ घालायला सुरुवात केली. चक्का हातात मोठ-मोठी दगडे घेऊन चारही दिशांना फेकू लागल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दगड लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्व प्रकारामुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पिंपरी चिंचवड : किरकोळ कारणावरून बाऊन्सरने तरुणाला केली मारहाण pic.twitter.com/H5OEoP86W2
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2020
मनोरुग्णामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हातात मोठ-मोठे दगड घेऊन चारी दिशांना भिरकाऊ लागल्याने सकाळच्या वेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला- मुली आणि इतर नागरिकांना दगड लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच रस्त्यावरून जड वाहनांची देखील वाहतूक सुरू होती. अशावेळी एखाद्या वाहनाची 'त्या' मनोरुग्णाला धडक बसून जीवही जाऊ शकत होता. या मनोरुग्णाचे नाव काय आहे हे समजू शकले नाही. एवढंच नाही तर या गोंधळात दरम्यान 'त्या' मनोरुग्णाने भिरकावलेला एक दगड महाविद्यालयात चाललेल्या एका मुलीला लागता-लागता राहिला. यातून ती थोडक्यात बचावली. अखेर काही वेळानंतर पोलीस आणि स्थानिकांनी या मनोरुग्णाला पकडलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.बीड - भररस्त्यावर मनोरुग्णाचा धिंगाणा, व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/wGWME0CnhQ
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.