भामट्यांनी लढवली अनोखी शक्कल, दुधाच्या नावाखाली अशी सुरू होती गोमांस वाहतूक

भामट्यांनी लढवली अनोखी शक्कल, दुधाच्या नावाखाली अशी सुरू होती गोमांस वाहतूक

दुधाच्या नावाखाली टेम्पोतून गोमांस (Beef) वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

संगमनेर, 27 डिसेंबर: दुधाच्या नावाखाली टेम्पोतून गोमांस (Beef) वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे गोमांस नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावहून (Malegaon) मुंबईला (Mumbai) नेण्यात येत होते. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 टन गोमांस व वाहतुकीसाठी वापरला जाणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर रविवारी पहाटे ही कारवाई करत मुंबईतील टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा...नाथाभाऊ निघाले मुंबईला... पत्रकारानं विचारलं असता म्हणाले 'येता का लग्नाला?'

नाथा मनोहर रसाळ (वय-42, रा. चितागेम ट्राम्बे करमरा मैदान, मानखुर्द, मुंबई) असं आरोपी टेम्पो चालकाचं नाव आहे. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक यमना नामदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांना दुधाच्या वाहनातून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी गोमांस वाहतूक होत असलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी टोलनाका येथे वाहनांची तपासणी करत असताना दुध नाव लिहिलेल्या चॉकलेटी व पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोची (एम. एच.03. सी. पी. 8858) तपासणी पोलिसांनी केली. या टेम्पोत मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात नेले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हे गोमांस मालेगावहून मुंबईला नेण्यात येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. टेम्पो चालक नाथा रसाळ विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा..लाडक्या कुत्र्याची बिबट्याने पकडली मान, मालकाने जीव धोक्यात घातला आणि...

चार लाख रूपये किंमतीचे चार टन गोमांस व 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 8 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल कारवाईवेळी जप्त करण्यात आला. पोलीस हेड कॉस्टेबल एस. एस. पाटोळे अधिक तपास करीत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 27, 2020, 5:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या