बीड, 26 जानेवारी : झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीदवाक्य आपण नेहमी ऐकतो. शासनाच्या स्तरावरून अनेकदा झाडे लावण्यासाठी विविध मोहीम, आणि योजना देखील राबवल्या जातात. असाच झाडे लावायचा उपक्रम बीड जिल्ह्यातील काही तरुणांनी हाती घेतलाय. बघता बघता संपूर्ण गाव आता हिरवळीने नटले आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळशिंग हे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव. आधीपासूनच या गावात झाडाची मोठी कमतरता होती. या गावातील तरुण सोमीनाथ भुजबळ व शिवराज जगताप या युवकांनी, एकत्र येत गावात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. या मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला.
1500 झाडे
2020 पासून या वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. या वृक्ष लागवडीसाठी काही झाडे ग्रामपंचायतीने दिली तर काही झाडांसाठी सोमीनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः खर्च केला. आता या गावात दीड हजार पेक्षा अधिक झाडे आहेत.
या झाडांची लागवड
कडी लिंबू, बदाम, पिंपळ, चिंच, अशोका अशा 50 पेक्षा अधिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली असून आता ही झाडे गावकऱ्यांना सावली देत आहेत. यामधून मिळणारा ऑक्सिजन गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी एक मोठं वरदान ठरतोय.
ग्रामीण भागातील मुलींना आत्मनिर्भर करणारे माध्यम, शेकडो जणींना मिळाला रोजगार
अशी मिळाली प्रेरणा
सोमीनाथ भुजबळ या तरुणाने 2021 मध्ये अहमदनगर, जिल्ह्यातील शिरापूर येथे भेट दिली. या ठिकाणी शिवाजी जाधव यांनी वृक्षारोपणाची मोहीम राबवल्याचे सोमीनाथ यांनी पाहिले. आपल्या गावातही वृक्षारोपण झाले पाहिजे अशी त्यांची भावना झाली. त्यानंतरच त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. छोट्याशा रोपट्यापासून सुरू केलेली मोहिमेचे आता वट वृक्षात रूपांतर झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.